Instructions - Health Application



About Vaccines and Preparation before vaccination

What are vaccines?
A vaccine is a biological preparation that improves immunity to a particular disease. A vaccine typically contains an agent that resembles a disease-causing microorganism, and is often made from weakened or killed forms of the microbe, its toxins or one of its surface proteins. The agent stimulates the body's immune system to recognize the agent as foreign, destroy it, and "remember" it, so that the immune system can more easily recognize and destroy any of these microorganisms that it later encounters. - WHO.

Importance of Vaccination
Vaccination protects children from serious illness and complications of vaccine-preventable diseases which can include amputation of an arm or leg, paralysis of limbs, hearing loss, convulsions, brain damage, and death. Vaccine-preventable diseases, such as measles, mumps, and whooping cough, are still a threat.

Benefits of vaccination
Some of these diseases can cause serious long-term health problems or death. Vaccines have saved more lives than any other medical intervention, including antibiotics or surgery. Vaccines also help prevent disabilities such as blindness and paralysis that can be caused by disease.

Objectives
Vaccination is an effective way to reduce morbidity and mortality related to infectious diseases.

Immunization
Immunization is the process whereby a person is made immune or resistant to an infectious disease, typically by the administration of a vaccine. Vaccines stimulate the body's own immune system to protect the person against subsequent infection or disease.
IAP latest recommendations on vaccinations
IAP Guidelines 2018-19

Preparing for Vaccination:
Usually parents should know the child is healthy, good and happy before taking to the vaccination. It is important to measure child's temperature. Check for minor illness, fever, cough or cold. Do not guess, Take the temperature before the vaccination.
-Try to have your child calm before taking it.
-For taking temperature use armpit, it is safe for a child especially babies.
-Use digital thermometers for accuracy and safety.
Useful temperature chart (based on armpit readings)
Normal temperature is about 37℃ or 98.6℉, However, it can be as low as 36.1℃(97℉) in the morning to a high of 37.2℃(99℉) in the evening and still be considered normal. An infant may show more than normal temperature if she/he is overdressed. There are external as well as internal factors due to which temperature varies and still considered as normal. Surrounding temperature range if it is hot or cold. Body temperature varies in babies, toddler and adults Temperature can show variation if human being is sleepy, hungry or cold. The area where the temperature reading is taken also shows variation like armpit, oral, rectal, ear or core. Even the gender shows temperature variation.

Following are the general guidelines, in case of any doubts it is advisable to consult your DOCTOR before any conclusion.
In case of Fever also follow the same and take temperature every 4 hours and keep record in fever tracker.

Range Stages Help to manage fever
94.5℉ -99.1℉ Normal- No fever
99.3℉-100.4℉ Low fever -Take most of the clothes off
- Do nor wrap child in a blanket
- Keep room cool, use a fan
- Give more water to drink.
100.4℉-102.02℉ Fever All above measures and fever medicines.
102.2℉ and higher High Fever Contact your doctor immediately

You are ready to go :
Inform your Doctor, Confirm your appointment
Carry child's vaccination records along with to the Doctor.

On reaching your Doctor :
Inform Doctor if the child has any allergy to egg.
Update Doctor with any history of convulsions or any ongoing medications. If you have any queries about a vaccine ask beforehand. Read the information and know after effect and care to be taken.
Make it less stressful for the child and family, DO not create any fears about injection and Doctor. Otherwise child becomes more resistant and uncooperative to the process.

Common side effects after the vaccination: Majority times seen
Children may feel mild discomfort after getting vaccination. This may last for 1 or 2 days.
Common.
-Redness at the place of injection
-Fever after 1 or 2 days, lasting 1 or 2 days.
-Cranky, fussy, irritable.
And more possible
-After oral vaccines, diarrhea, stomach pain, gas
-After MMR or chickenpox vaccine: fever rash or both may appear up to several weeks
-Lump at the place of injection may last for 1 to 4 weeks and goes away, it usually does not harm.

Help in case of sore arm or leg
- Cuddle your child.
- Hold your child sitting up -
- Apply a clean, cool, wet washcloth to sore area.

If needed to take medicine for fever post vaccination.
TAKE MEDICINES ONLY UNDER THE INSTRUCTIONS OF YOUR DOCTOR.

CONTACT doctor immediately if your child has any of the following:POST VACCINATION

- High fever (39℃/102.2℉ or higher)
- Weakness and looks pale or sick
- Increased sleepiness and does not wake up to eat.
- Crying for more than 3 hours
- A strange cry, different than their normal cry
- Hives (raised red or pink spots of different sizes on skin)
- Seizure or convulsions (shaking, twitching or jerking motions of the body)
- Swollen abdomen, vomiting often, bloody stools
- A fever for more than 48 hours



लसीबद्दलची अधिक माहिती
लस म्हणजे काय?

लस म्हणजे एक जैबिक उत्पादन असते, ज्यामुळे एखाद्या विशिष्ट रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते. लसीमध्ये रोगाचे कारण असणाऱ्या सूक्ष्मजीवाशी मिळताजुळता असा घटक असतो. बहुतेकवेळा तो त्या सूक्ष्मजीवाचे, त्याच्या विषाचे किंवा त्याच्या पृष्ठभागावरील प्रथिनांचे दुर्बल केलेले स्वरूप किंवा मृत सूक्ष्मजीव असतो. या घटकामुळे शरीराच्या प्रतिकार संस्थेला चालना मिळते. तो घटक परका म्हणून ओळखला जातो, त्याचा नाश केला जातो आणि तो 'स्मरणा'त ठेवला जातो. त्यामुळे प्रतिकारसंस्थेला त्या सूक्ष्मजीबाशी परत गाठ पडल्यास त्याला ओळखणे आणि नष्ट करणे सोपे जाते.

- जागतिक आरोग्य संघटना :
लसीकरणाचे महत्त्व :
लसीकरणामुळे लहान मुलांचे गंभीर आजारांपासून आणि त्यापासून उद्‌भवणाऱ्या इतर हानीपासून संरक्षण होते. लसीकरणामुळे रोखता येणाऱ्या रोगांमुळे हात किंवा पाय कापावा लागणे, हात-पाय, अवयव लुळे पडणे, श्रवणशक्ती नष्ट होणे, फीट येणे, मेंदूला इजा आणि मृत्यू हे परिणाम होऊ शकतात. लसीकरणामुळे रोखता येणारे गोवर, गालगुंड व डांग्या खोकला यासारखे रोग अजूनही धोकादायक आहेत.

लसीकरणाचे फायदे :
यापैकी काही रोगांमुळे प्रकृतीला दीर्घकालीन समस्या किंवा मृत्यू येऊ शकतो. प्रतिजैविके किंवा शस्त्रक्रिया यासारख्या इतर वैद्यकीय उपायांपेक्षाही लसीकरणामुळे जास्त प्राण वाचले आहेत. तसेच आजारांमुळे येऊ शकणाऱ्या अंधत्व किंवा पंगुत्व यासारख्या परिणामांना लसीकरणामुळे प्रतिबंध होण्यास मदत होते.

उद्दिष्टे:
संसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण घटविण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे :
या प्रक्रियेमध्ये व्यक्ती लस दिल्यामुळे संसर्गजन्य रोगापासून मुक्त होते. लसीकरणामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक संस्थेला चालना मिळते व त्यामुळे व्यक्तीचे त्या रोगाच्या संसर्गापासून संरक्षण होते.

'लसीकरणाबाबत आयएपीच्या मार्गदर्शक सूचना
लसीकरणापूर्बी आपल्या डॉक्टरांना कळवा आणि भेटीची वेळ ठरवा. डॉक्टरांकडे जाताना आपल्या मुलाची लसीकरणाबाबतची माहिती बरोबर ठेवा. किरकोळ आजार, ताप, सर्दी-खोकला यासाठी तपासणी करा.
मुलाला अंड्याची अलर्जी असल्यास डॉक्टरांना सांगा.
मुलाला फीट येत असल्यास व कोणतेही औषध चालू असल्यास डॉक्टरांना माहिती द्या. लसीबद्दल कोणतीही शंका असल्यास आधी विचारून घ्या. त्याबद्दलची माहिती वाचा आणि त्याचे परिणाम व घेण्याची काळजी या गोष्टी जाणून घ्या.

लस देणे हे मूल आणि कुटुंबासाठी कमी तणावपूर्ण होईल ते पहा. इंजेक्शन आणि डॉक्टर याबाबत मुलाला भीती घालू नका, नाही तर मूल सहकार्य करीत नाही आणि विरोध करते.

लसीकरणानंतर दिसणारे सामान्य परिणाम आणि घेण्याची काळजी :
लसीकरणाआधी मूल निरोगी आणि आनंदी आहे, हे पालकांना माहीत असले पाहिजे.
मुलाच्या शरीराचे तापमान मोजणे महत्त्वाचे आहे. अंदाज करू नका. लसीकरणाआधी तापमान मोजा.

- तापमान मोजण्याच्या आधी मुलाला शांत ठेवा.
- तापमान मोजण्यासाठी काखेतील तापमान घ्या. लहान मुलांसाठी ते सुरक्षित असते.
- अचूकता आणि सुरक्षिततेसाठी डिजिटल थर्मामीटर वापरा.
उपयुक्‍त तापमान तक्ता (काखेतील नोंदीवर आधारित)
ताप असल्यास याच सूचनांचे पालन करा. दर चार तासांनी तापमान मोजा आणि त्याची नोंद फीवर ट्रॅकरमध्ये ठेवा.

पातळी टप्पा -- उपाय
९४.५" - ९९.१" फॅ. -- सामान्य ताप नाही
९९.३" - १00.४' फॅ.-- कमी ताप बहुतेक कपडे काढून घ्या.बाळाला पांघरूणात गुंडाळू नका. खोली थंड ठेवा.पंखा वापरा. जास्त पाणी पिण्यास द्यावे.
१00.४"- १0२.0२"फॅ.-- ताप वरील सर्व उपाय व तापावरील औषधे द्यावीत.
१0२.२" किंवा जास्त -- उच्च ताप आपल्या डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा.

लसीकरणानंतरची सर्वसामान्य लक्षणे :
बहुतेक वेळा दिसतात. लसीकरणानंतर मुलाला थोडे अस्वस्थ वाटणे ही स्थिती १-२ दिवस टिकते. जास्त गंभीर लक्षणे दिसणे दुर्मिळ आहे.
सामान्य लक्षणे :
इंजेक्‍शन दिलेल्या जागी लाल होणे, १-२ दिवसांनी ताप येणे, तो १-२ दिवस टिकतो. मूल अस्वस्थ, चुळबूळ करणारे, चिडचिडे होते.

इतर शक्‍य लक्षणे
- तोंडावाटे दिलेल्या लसीनंतर जुलाब, पोटदुखी, गॅस
- एमएमआर किंवा कांजिण्यांवरील लसीनंतर ताप, पुरळ किंवा दोन्हीही काही आठवड्यापर्यंत येण्याची शक्‍यता असते.
- इंजेक्शन दिलेल्या जागी गाठ येते, जी १-४ आठवडे टिकते आणि नाहीशी होते. धोकादायक नसते.

हात किंवा पाय अतिसंवेदनशील झाल्यास :
- मुलाला जवळ घेऊन गोंजारा.
- मुलाला बसते करा.
- संवेदनशील जागी स्वच्छ, गार पाण्याने भिजवलेले कापड ठेवा.

तापासाठी औषध देणे आवश्यक असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध द्या.